1 min read

नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान

Loading

नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान

अमळनेर (प्रा. जितेश चव्हाण) राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या वतीने अमळनेर येथील नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला नुकताच बी श्रेणी प्रदान करण्यात आली.
उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, यासाठी ५ वर्षातून एकदा नॅक समितीच्या वतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. या नॅक मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान नॅक (NAAC) बेंगलुरु यांचे तर्फ तीन सदस्य समिती मध्ये अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.) समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू या मूल्यांकन समितीने नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयास दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट देऊन विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची तपासणी करून मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मेंटॉर डॉ. जयेश गुजराथी यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रभाकर चौधरी, नॅक समन्वयक प्रा.डॉ. नयना वाणी, प्रा.डॉ. नरेंद्र पाचपांडे. प्रा.डॉ. अंजली जोशी, प्रा.डॉ. जितेश चव्हाण, प्रा. उषा पाटील, प्रा.डॉ. सुनंदा तायडे, प्रा कैलाश देवरे सर्व प्राध्यापकांनी प्रत्येक क्रायटरीयावर सखोल अभ्यास व मार्गदर्शन घेऊन आवश्यक माहिती संकलित केली, कार्यालयीन कर्मचारी अनिकेत सुर्यवंशी, किरण रावळ, ग्रंथपाल गिरीश पाटील यांनी कार्यकुशलतेने कार्यालयीन कामकाज सांभळले तर राजेंद्र वाघ, विनोद सोनवणे, सोपान पाटील, चेतन थोरात यांसह आयटीआय, आमि स्कूल, या संस्थेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्याथी यांनी अथक परिश्रम अथक परिक्षम घेऊन मूल्यांकन प्रक्रियेस सामोरे गेले. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच पालक वर्ग व इतर सर्व संबंधित घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा.नानासो विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील प्रशसकिय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा.श्याम पवार यांसह संस्थेचे पदाधिकारी वर्गाकडून महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *