1 min read

कै.शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश..

Loading

कै शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश..

अभियोग्यता चाचणी द्वारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जळगांव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून मयुर धनगर ची निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर पंचायत समितीचे शिक्षणाविस्तराधिकारी
कै पी.डी.धनगर यांचा चिरंजीव मयुर धनगर शैक्षणिक विकासाची घोडदळ पाण्यात आज वडील राहिले असते निश्चितच त्यांना अभिमान वाटला असता..
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर अभियोग्यता चाचणी यशस्वी करून शिक्षक होणार… त्यांची निवड झाल्याबद्दल अमळनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व शिक्षण विस्ताराधिकारी प्रतिभा सुर्वे, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे…
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर पंचायत समितीतील दिवंगत शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासो पी डी धनगर साहेब यांचे चि. मयूर धनगर यांची महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणी द्वारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जळगांव जिल्हा परिषद येथे गुणवत्तेनुसार उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आहे. मयूर धनगर यांनी एम.एससी. (गणित) बी.एड. असे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना अभियोग्यता चाचणीत 137मार्क्स मिळाले असून, ते CTET 2 वेळेस व MHTET 1 वेळेस उत्तीर्ण आहेत. ते सध्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयात मानधन तत्त्वावर गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जर अण्णासाहेब आज हयात असले असते तर बाप अधिकारी मुलगा शिक्षक असे असते ..परंतु नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती म्हणून स्वर्गवासी अण्णांचे गेल्या पाच महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे.
मयूर ने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षकांची नोकरी स्विकारून ख-या अर्थाने वडिलांना श्रद्धांजली दिली …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *