1 min read

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन—–!

Loading

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन—–!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 23 फेब्रुवारी, शुक्रवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला शालेय विद्यार्थिनी राधिका पारधी हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपक्रमशील शिक्षक डी.ए. सोनवणे हे होते. कार्यक्रमानंतर डी. ए. सोनवणे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनाविषयी सर्व उपस्थिताना जीवनपटाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी मुलांसाठी छात्रालय, गोरगरिबांसाठी धर्मशाळा, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाण्याची व्यवस्था, बेघरांना राहण्यासाठी आसरा, अंध, अपंग, रोगी यांच्यासाठी औषधोपचाराची व्यवस्था, पशुपक्षी मुक्या प्राण्यांसाठी अभय ,तरुण तरुणी गोरगरिबांच्या लग्नाची व्यवस्था, दुःखी, निराशांना हिम्मत देण्याचे काम, असे अनेक उपक्रम राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी राबवले. सर्व तळागाळातील समाजातील ज्या काही खोट्या अंधश्रद्धा होत्या त्या त्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी देव हा निर्जीव वस्तूत नसून सजीव प्राण्यात आहे म्हणून आपण माणसात देव शोधला पाहिजे, असे विचार त्यांनी संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
उपक्रमशील शिक्षक डी.ए.सोनवणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना एक आव्हान केलेले होते. आपण थोर राष्ट्र महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी का साजरी करतो याविषयी आपण तुम्हाला आवडलेल्या थोरांच्या जयंती किंवा पुण्यतिथी विषयी फोटो आणि माहिती तयार करून अल्बम तयार करून आणायचा आहे. जे विद्यार्थी आकर्षक अल्बम तयार करतील त्यांच्यासाठी योग्य ते बक्षीस दिले जाईल. सदरचे आवाहन स्वीकारून बऱ्याच विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या कार्याचा अल्बम माहितीसह तयार करून शाळेत उपस्थित केला. सदरच्या अल्बम मधून पर्यवेक्षक म्हणून पी.एम. ठाकरे यांनी एक दोन तीन असे क्रमांक निवडले. सदर विद्यार्थ्यास प्रथम क्रमांक राधिका दिलीप पारधी, द्वितीय क्रमांक दिव्या कैलास पाटील ,आणि तृतीय क्रमांक रिया धनगर व चेतना कोळी यांचे काढण्यात आले. सदर विद्यार्थिनींना डी.ए. सोनवणे यांच्याकडून रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. सदर प्रसंगी शिक्षिका अर्चना महाजन, छाया निकम, भारती चव्हाण, वंदना जाधव ,सुषमा तेले तसेच शिक्षक व्ही डी. पाटील, पी.एम. ठाकरे, डी. एस. माळी,ए.पी. जाधव, वाय. जे .पाटील, उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *