हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने साने गुरुजी पतपेढीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
![]()



हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने साने गुरुजी पतपेढीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी व शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार सर यांनी केले..
हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे आपल्या मंडळातील अनेक पदाधिकारी चांगल्या मतांनी सुद्धा यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व काही थोड्या मतांनी पराभूत झाले त्यांचेही अभिनंदन मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी व मंडळाचे सचिव दिलीप पाटील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर यांनी सांगितले..
श्री गजानन माऊली पॅनलचे प्रमुख राजेंद्र पाटील हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे व मंडळाचे सदस्या प्रतिभा देवराम जाधव या पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला..
मंडळाचे सचिव दिलीप पाटील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इनशुलकर जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन ,सदस्य प्रदीप चौधरी उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन प्रदीप चौधरी यांनी मानले..
चौकट
पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत सर्व सभासद बांधवांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला चांगल्या मतांनी निवडून दिले त्याबद्दल संस्थाचालक, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी आपल्या
सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. भविष्यात पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हित जोपासण्यासाठी आम्ही नेहमीच कटी बद्ध राहू..
राजेंद्र पाटील
पॅनल प्रमुख माऊली जय गजानन
आशिष दिलीपराव शिंदे
तालुका अध्यक्ष
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर



