1 min read

व्हि.एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.

Loading

व्ही एस पवार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट.
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती
महोत्सवानिमित्त शुक्रवारी दि.१६ रोजी एकदिवसीय भव्य
शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्री
ना. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय येथे
हे प्रदर्शन आयोजित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे
आयोजन करण्यात असून, त्याच अनुषंगाने शुक्रवारी १६ रोजी
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय येथे
आयोजन करण्यात आले होते. शस्त्र संग्राहक व अभ्यासक पंकज
दुसाने यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनाला दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल रामवाडी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भेट दिली. त्यावेळी मा. ना. श्री अनिल दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रदर्शनाच्या वेळी संस्थेच्या सचिव अलका पवार व उपाध्यक्ष उमाकांत पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शस्त्र विषयी शाळेच्या प्रिन्सिपॉल वर्षा सोहिते शिक्षिका पल्लवी येवले, स्वाती चव्हाण, योगिता फाळके, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील, मनीषा शिरसाठ, मनीषा सोनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *