1 min read

आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला

Loading

आश्रम शाळा पिंपळे येथे परसबागेत पिकवला जातो सेंद्रिय भाजीपाला

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बु. येथे दरवर्षी परसबाग तयार केली जाते, व त्यातून सेंद्रिय भाजीपाल्याची उत्पन्न घेतले जाते, शाळेत निघणाऱ्या उष्टे अन्न कुजवुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते, व या कंपोस्ट खतांचा वापर करून परसबाग फुलवली जाते. सध्या परसबागेत वांगे, मिरची, भोपळा, शेवगा, कोथंबीर, पालक, या प्रकारचा भाजीपाला घेऊन विद्यार्थ्यांना सकस व सेंद्रिय अन्न पुरवण्याचा प्रयत्न आश्रम शाळेत विद्यार्थी व शिक्षकांमार्फत केला जातो. बदलत्या जीवनशैलीत जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिवापर भाजीपाला उत्पादनासाठी केला जातो, व त्याचे होणारे दुष्परिणाम आपण सर्व जण पाहत आहोत,या खतांच्या अतिवापर केल्याने बालकांच्या आरोग्यावर, व शारीरिक विकासावर होणारे अनिष्ट परिणाम यांची विद्यार्थी वयातच जाणीव होणे गरजेचे असल्याने हा उपक्रम आश्रम शाळेत राबवला जातो आश्रम शाळेतील वर्गनिहाय विद्यार्थ्यांना परसबागेसाठी एक एक छोटा प्लॉट दिला जातो व त्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर निश्चित केली जाते वर्गशिक्षक व विद्यार्थी दोन्ही मिळून या छोट्याशा प्लॉटमध्ये भाजीपाला पिकवण्याचे काम लागवडीपासून भाजीपाला निघेपर्यंत अतिशय प्रामाणिक व उत्साहाने करीत असतात तसेच जास्तीचा निघणारा भाजीपाला विद्यार्थी शिक्षकांना विक्री करतात व त्यातून पुन्हा बियाणे किंवा परसबागेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पैशांचा वापर करीत असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *