पिंपळे आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना झारखंड राज्य माहितीपट दाखवण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी हस्तलिखित व भित्तिपत्रकाद्वारे केले माहितीचे सादरीकरण
![]()
पिंपळे आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना झारखंड राज्य माहितीपट दाखवण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी हस्तलिखित व भित्तिपत्रकाद्वारे केले माहितीचे सादरीकरण
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ व यशवंत माध्य आणि उच्च माध्य आदिवासी आश्रम शाळा, पिंपळे बु.ता.अमळनेर, जि.जळगाव येथे मान. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणे हेतूने झारखंड राज्य माहितीपर चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना झारखंड राज्याची संस्कृती सण, उत्सव, झारखंड राज्याचे राष्ट्रास योगदान इत्यादी विषयी माहिती होणे व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढणे हा होता. तसेच अकरावी विज्ञान वर्गातील संदीप मेरसिंग पावरा व राधा बादल पावरा या विद्यार्थ्यांनी झारखंड राज्यावर माहिती देणारे हस्तलिखित शालेय ग्रंथालयास सादर केले.विद्यार्थ्यांनी सदर शालेय ग्रंथालयातील हस्तलिखितचा वापर करून झारखंड राज्याची माहिती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रकाद्वारे दर्शविण्याचा प्रयत्न केला. सदर माहितीचे लेखन विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेत केलेले असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची वाढ व राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना हा होता. सदर उपक्रमांचे आयोजन प्राथ.मुख्या अविनाश अहिरे व माध्य मुख्या उदय पाटील यांच्या नियोजनानुसार करण्यात आलेले होते. सदर हस्तलिखित व माहिती पुस्तक तयार करण्यासाठी माधुरी पाटील व हेमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वी होण्याकरिता अविनाश पाटील, प्रतिक पाटील, रविंद्र नेरकर यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे संस्थेच्या अध्यक्षा ताईसौ.विद्याताई युवराज पाटील व सचिव नानासाहेब युवराज दादाजीराव पाटील यांनी कौतुक केले व त्यांना यशस्वी भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.


