1 min read

सर्वसाधारण जनरल मतदारसंघातीलअपक्ष उमेदवार योगेश सुरेश चौधरी यांचा जोरदार प्रचार सुरू…

Loading

सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील
अपक्ष उमेदवार योगेश सुरेश चौधरी यांचा जोरदार प्रचार सुरू…

पॅनल पेक्षा अपक्ष उमेदवारांच्या
नावाची होतेय चर्चा…

जाहिरात…

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहपतपेढी  अमळनेर ची पंचवार्षिक निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे.. अमळनेर तालुक्यात दोन पॅनल यांचाही जोरदार प्रचार सुरू असताना अपक्ष उमेदवार चौधरी योगेश सुरेश यांच्या प्रचाराची तालुक्यात चर्चा होत आहे.. प्रत्येक शाळेवर जाऊन प्रत्येक सभासदांची ते वैयक्तिक संपर्क साधत आहेत..
योगेश सुरेश चौधरी हे माध्यमिक विद्यालय दोधवद येथे माध्यमिक शिक्षक आहेत…
ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत सध्या अमळनेर तालुक्यात साने गुरुजी शिक्षक पतपेढी श्री माऊली गजानन पॅनल व सहकार पॅनल यांचा प्रचार सुरू असतांना अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराची शहरांमध्ये मोठी चर्चा आहे…
सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीची निवडणुक 18 फेब्रुवारी रविवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान मतदान आहे . .
योगेश सुरेश चौधरी हे सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.. त्यांचे चिन्ह शिटी असून त्यांना तालुक्यातील सभासद बंधू आणि भगिनींनी भरगोच्च मतांनी विजयी करून सेवेची संधी द्यावी असे त्यांनी मराठी लाईव्ह न्युज शी बोलतांना सांगितले…

सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार
चौधरी योगेश सुरेश
माध्यमिक विद्यालय दोधवद
चिन्ह -शिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *