1 min read

मारवड कला महाविद्यालयात मिशन साहसी अभियान कार्यशाळा.—

Loading

मारवड कला महाविद्यालयात मिशन साहसी अभियान कार्यशाळा.—

अमळनेर प्रतिनिधी
मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात क.ब.चौ.उ.म.वि.च्या विद्यार्थी विकास विभागामार्फत व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि युती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच दिवसीय ‘ ‘मिशन साहसी’ अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या अंतर्गत दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी स्त्रियांचे आरोग्य व योगा यावर योग शिक्षिका प्रा.अर्चना पाटील मॅडम यांचे तर दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी डॉ.विद्या देवरे वैद्यकीय अधिकारी मारवड यांचे स्त्रियांचे आरोग्य व समस्या तसेच दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी मा.भारती गाला मॅडम संचालिका कलाश्री क्राफ्ट अमळनेर यांचे गृह उद्योग व महिला या विषयावर तर दि.16 फेब्रुवारी रोजी अॅड.शशिकांत पाटील अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अमळनेर यांचे महिलांचे कायदे व हक्क आणि दि. 17 फेब्रुवारी रोजी प्रा. डॉ. अर्चना पाटील यांचे स्वयंरोजगार व बचत गटाची भूमिका यावर व्याख्यान आयोजित केले आहे. सदर कार्यशाळेचा समारोप दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता माननीय आबासो.जयवंतराव मन्साराम पाटील अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे .
याप्रसंगी समारोप करते म्हणून माननीय प्रा.डॉ. संजय पाटील जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. संदिप नेरकर सिनेट सदस्य
क.ब.चौ.उ. म. वि. जळगाव तसेच प्राचार्य डॉ.वसंत देसले यांचे उपस्थितीत आयोजित केलेला आहे, असे महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी कळविले आहे.
सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी N S S स्वयंसेवक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *