अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
![]()
अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मुंबईहून विशेष बातमीपत्र.)

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसचा हात सोडून हातात कमळ घेऊन आपल्या समर्थकांसह मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
लोकसभा निवडणूक आधी महाराष्ट्र मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी दिली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला फार मोठे खिंडार पडले आणि त्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपला विधानसभा परिषदेचा राजीना देऊन काँग्रेस पक्ष सोडला. हा काँग्रेसला फार मोठा धक्का होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा क राजीनामा त्याने काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केला. आणि विधान परिषदेतील आपल्या राजीनामा राहुल नार्वेकर यांना सादर केला. भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीआधी ही केलेली फार मोठी खेळी आहे. कारण राज्यसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसमध्ये एक जागा सहज निवडून आली असती परंतु अशोक चव्हाण यांच्या फुटी नंतर राज्यसभेची ती जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनामा नंतर काँग्रेसला फार मोठा धक्का बसला नाना पटोरी, वर्षाताई गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांना या त्यांच्या फुटीची कल्पना नव्हती असे सांगितले जाते. रविवारी काँग्रेस प्रभारी यांच्या उपस्थित टिळक भवन झालेला बैठकीत अशोक चव्हाण उपस्थित होते व त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतलेला निर्णय प्रसार माध्यमांमधून कळला. अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य होते गेली अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण म्हणून वावरत होते खासदार आमदार, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद अशी अनेक पदे त्यांना पक्षाने दिली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची धुराही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती, आणि असा हा योद्धा काँग्रेस सोडून गेला हे फारच धक्कादायक होते. आदर्श गैर व्यवहारांमध्ये त्यांचे नाव गुंतले होते आणि त्याचा परिपाक म्हणून भीतीपोटी त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला असे काँग्रेसचे नेते बोलत आहेत. अशोक चव्हाण यांच्याबरोबर किती आमदार व समर्थक जातात हे आता आपल्याला पुढील निवडणूक लक्षात येईल महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसला मोठे खिंडार पडल्यामुळे येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडी काय निर्णय घेणार? आणि त्यांच्या आघाडीचे काय भविष्य असणार? हे येणारा काळच ठरवेल.
काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अवघ्या २४ तासात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, प्रताप पाटील चिखलीकर अशा दिग्गज नेत्यांची फौज पाहायला मिळाली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.पुर्णत: काँग्रेस मध्ये आपले राजकीय आयुष्य व्यतीत केलेल्या अशोक चव्हाण यांच्या भाजपच्या प्रवेशाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहे.

