३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न.
![]()


३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न.
( डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दला मार्फत ” रस्ता सुरक्षा पथकाची (आर एस पी) स्थापना) “
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी पथकाचे कार्य मोलाचे ठरेल;: पी एस आय दिलीप गांगुर्डे
नंदुरबार( प्रतिनिधी)३४ वा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त, नंदुरबार वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक एस एन.जाधव यांचा मार्गदर्शनाखाली, आर एस पी अधिकारी युनिट संघटन नागपूर यांचा माध्यमातून नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार ,संचलित डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण दल, नागपूर अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये ” रस्ता सुरक्षा पथक ” (आर एस पी) याची स्थापना करणे. नंदुरबार जिल्ह्यात त्याची सुरुवात प्रथम डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे कार्यक्रम घेवून करण्यात आली. प्रा.निशिकांत शिंपी यांची नंदुरबार जिल्हा आर एस पी समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी ठाणे पालघर व नाशिक विभागाचे आर एस पी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी, नंदुरबार वाहतूक शाखेचे पीएसआय दिलीप गांगुर्डे, पीएसआय कमलसिंग पवार, वातुक शाखेचे जोने, डी आर ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापक निशिकांत शिंपी, अरविंद साहेब , कॉन्स्टेबल मीनाबाई पवार, कॉन्स्टेबल सुनिता मोरे व शाळेचे पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण उपस्थित होते.
आपले जीवन अनमोल आहे, वाहन चालवत असताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे . वाहन चालवण्याचा परवाना काढणे, हेल्मेट वापरणे, सीट बेल्टचा वापर करणे, वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करु नये, वाहन चालवतांना कुठल्याही प्रकारचे मद्यपान न करणे याविषयी पोलीस कॉन्स्टेबल मीनाबाई पवार यांनी मार्गदर्शन केले. आर एस पी पथकाचे काम काय, युनिटची स्थापना का करावी ? भविष्यात विद्यार्थिनींसाठी काय फायदे आहेत ? याविषयी नाशिक विभागाचे कमांडर डॉ.मणिलाल शिंपी व वाहतूक शाखा नंदुरबार चे पीएसआय दिलीप गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन हेमंत बोरसे यांनी केले.

