1 min read

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर

Loading

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर
सतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखनासाठी निरंतर चैतन्य देणे या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात आले.
काव्यलेखन :- बालकविता – प्रथम – चिमणी उडाली भुर्र sss – सौ.माया दिलीप धुप्पड
द्वितीय (विभागून ) १ ) पाऊस शाळा – रविंद्र सोनवणे २ )
मुलं जमिनीवरचे तारे – गोविंद पाटील
प्रौढ काव्यलेखन – प्रथम ( विभागून ) – ‘ बाई अन् कविता ‘- जयवंत बोदडे आणि ‘ जावे गुंफित अक्षरे ‘ – सौ.संध्या भोळे
द्वितीय : – ( विभागून )’ मनाच्या व्यथा ‘ – पुष्पा साळवे आणि
‘ क्रांती लहर ‘ – अजय भामरे
तृतीय ( विभागून ) – ‘ पालवी ‘ – इंदिरा जाधव आणि ‘ भावनांचे लावण्य ‘ – धनश्री रमेश मिस्तरी
उत्तेजनार्थ – पांगल्या पायवाटा : – तुकाराम पाटील पाळधीकर ,
देवाचिये द्वारी – प्रा.पुरुषोत्तम पटेल ” पुष्प “
लेवा गणबोली ( काव्य ) – मनाच्या बनामंधी : शीतल शांताराम पाटील
अहिराणी काव्य – सर्वे : मोहन पाटील
कथालेखन : – प्रथम – मनोबल तिमिरातून तेजाकडे : चित्रा वाघ द्वितीय – वाटणी : दीपक तांबोळी
तृतीय – सत्यशोधक आणि इतर कथा : प्रा.भरत आ.शिरसाठ
विशेष ललीत गद्य पुरस्कार – स्मृतिगंध माझं अमळनेर – ॲड. प्रदीप कुळकर्णी
ललित : – स्वातीचे थेंब – प्रा. पुरुषोत्तम पटेल ” पुष्प “
कादंबरी : – दयन – युवराज मेघराज पवार
अध्यात्मिक – कृष्णगंध (कविता ) – रितेश अत्तरदे
समिक्षा :- रंगू कविते संगे – प्रा. अरुण सु.पाटील व सौ.वसुंधरा अरुण पाटील
व्यक्तिमत्व विकास – प्रथम – ‘ सुसंस्कृत व्यक्तिमत्व ‘ – प्रा.डॉ.एल.ए.पाटील
द्वितीय – स्वप्नांचा जीवन प्रवास :
ऋषीकेश माधवराव पाटील ( पथराड )
शैक्षणिक : – प्रथम – ‘ विनोबांची शिक्षणछाया ‘ : संदीप वाकचौरे
द्वितीय – सारथी ( स्पर्धा परीक्षांचा सर्वकष माहितीकोश )
परीक्षा ) – प्रा.राजेंद्र चिंचोले
वैचारीक – प्रथम – सुखी संसारासाठी : प्रा.देवबा शिवाजी पाटील द्वितीय – ‘ बुध्द : गौरवशाली मार्गदाता ‘ – चित्रा भारत पगारे
संशोधनात्मक – ( लोकसाहित्य अन् कला ) – खान्देशचा लोकनाट्य तमाशा : देविलाल वाघु बाविकर
विशेष पुरस्कार – शाहिर शिवाना अहिरानी गाना ( सामाजिक व कौटुंबिक लोकगीते ) – शाहिर शिवाजीराव पाटील
चरित्र : – प्रथम – पीटर ताबीची ( आग्रह ‘ जीवन ‘ शिक्षणाचा ! – चंन्द्रकान्त भंडारी )
द्वितीय – त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर
तृतीय – (अनुवाद ) – प्रा.डॉ . श्रीकांत तारे ( राजमाता श्रीमंत बायजाबाई शिंदे – मुळ लेखक : डॉ.अजय अग्निहोत्री )
आत्मचरित्र : – काळया निळया रेषा – राजू बाविस्कर
द्वितीय :- शाहिरी मानवंदना – निंबा पुना बडगुजर .
पर्यावरण : – महाराष्ट्राचे एव्हरेस्ट
कळसुबाई शिखर सर करण्याचा माझा रोमांचकारी अनुभव – श्रीमद् प्रशांत बजगुजर
क्रिडा :- म – ‘ मॅरेथॉन ‘ चा ( कहाणी एका आरोग्यदायी चळवळीची ) डॉ.संदिप सूर्यकांत काटे
सदरहू स्पर्धेचा निकाल डॉ.विलास नारखेडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये अधिकृत घोषित केला.
स्पर्धेसाठी आलेल्या साहित्यकृतींचे मूल्यमापन नाट्यछटाकार अरविंद नारखेडे व कवी विजय सुपडू लुल्हे यांनी अल्पावधीत करून दिले.साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात पुरस्कारार्थी साहित्यिकांना स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत केले जाईल.पुरस्कारार्थींनी प्रत्यक्ष हजर राहून सन्मान स्विकारावा.सन्मानचिन्ह हस्तांतरित होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.कार्यक्रमाचा पुरस्कारार्थींनी यथोचित लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे,लीलाधर नारखेडे,कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय लुल्हे तसेच आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *