1 min read

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार

Loading

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार

अमळनेर प्रतिनिधी – सन 2024 मध्ये इयत्ता दहावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोबेल फाउंडेशन तर्फे विनामूल्य महासेमिनार “दहावीची रणधुमाळी” चे आयोजन करण्यात आलेले आहे.नवीन राष्ट्रीय धोरणाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक गौरव महाले व करिअर मार्गदर्शक जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दहावीचा अभ्यासक्रम, दहावीच्या अभ्यासाची पद्धती, बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न तसेच विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे .
सदर कार्यशाळा दिनांक 11 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा उद्योग केंद्राच्या मागे आयएमआर कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे. तरी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *