अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजनआर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन
![]()
अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजन
आर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन


धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त धुळे शहर वाहतूक शाखा त्यांचा संयुक्त विद्यमाने, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांचा नेतृत्वाखाली ,वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सुनिल इंमुलवार PSI वाहतूक यांचा प्रमुख उपस्थितीत,श्री अग्रसेनजी महाराज प्राथमिक विद्यामंदिर साक्री रोड धुळे येथे ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ठाणे पालघर आणि नाशिक विभाग आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी आर एस पी विषयाबद्दल सविस्तर माहिती दिली.वाहतूक पोलिस हवालदार मनोहर महाले यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळावेत,आणि लहान मुलांनी गाडी चालवने कायद्याने गुन्हा आहे. मुख्याध्यापक दिनेश मोरे यांनी विशेष सहकार्य करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले. धुळे जिल्हा आर एस पी समादेशक गणेशचंद्र सोनवणे यांनी रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजन केले होते. होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय अग्रवाल यांनी केले.

