ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा….
![]()



ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा….
अमळनेरला सर्व पक्ष व संघटनेच्या वतीने
निषेध करत
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन
अमळनेर प्रतीनीधी(ईश्वर महाजन)
संपूर्ण देशामध्ये अराजकतेचे वातावरण असताना व न्याय ही संकल्पना मूठभर लोकांपुरता सरकारद्वारे केंद्रित ठेवली जात असताना भारतीय राज्यघटनेने जे व्यक्ती स्वातंत्र्य व अभिव्यक्ती दिलेली आहे त्याच्या अधीन राहून व संविधानाच्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करून आज देशभरातील जनता अर्थातच त्यात या देशातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे आपापल्या परीने आपल्या स्वतःच्या संविधानाच्या रक्षणाची व अभिव्यक्तीची लढाई लढत आहे. परंतु या देशातील सर्व विद्यापीठांवर आपल्याच विचारसरणीच्या लोकांचा अधिकार असला पाहिजे व विरोधाचा आवाज पूर्णतः नष्ट केला पाहिजे या मानसिकतेचे सरकार आज या देशामध्ये आहे याचाच परिणाम म्हणजे जेएनयु पासून जामिया विद्यापीठापर्यंत आणि पाटणापासून पुणे विद्यापीठापर्यंत लढवय्या विद्यार्थ्यांचे मानसिक शोषण कसे करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न मोदी सरकार द्वारे केल्या जात आहे याकरिताच विद्यापीठांच्या फॅकल्टी मध्ये आपल्या विचारसरणीच्या प्राध्यापकांची गुणवत्ता नसताना भरती करणे व झुंडशाही आणि गुंडशाही प्रवृत्ती असणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या मार्फत संविधानाचा मार्ग अवलंबणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले घडवून आणणे या सरकारचे ध्येय आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे पुण्याच्या ललित कला केंद्राला अभिनय क्षेत्राचा एक मोठा वारसा आहे ज्या माध्यमातून आज या संपूर्ण देशभरामध्ये नामावंत असे कलाकार तयार झालेले आहेत त्याच ललित कला केंद्रात दोन दिवसापूर्वी आपल्या अमळनेर तालुक्यातील भावेश राजेंद्र पाटील याने ‘जब वी मेट’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले होते सदर नाटकात कुठलाही अनुसूचित प्रकार नसून यात कलाकारांची पात्र बॅक स्टेजला कसे असतात यासंदर्भातले वर्णन होते व ते नाटक हे त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून सादर केले जात होते या नाटकात जळगाव जिल्ह्यात अभिनय क्षेत्रात नाव असणारी अमळनेर ची भूमिका घोरपडे देखील होती परंतु सदर नाटक सुरू असताना गुंड प्रवृत्तीच्या वीस ते पंचवीस युवकांनी बंद पाडत उपस्थित कलाकारांना तेथील मुलींना मारहाण केली त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला व अर्वाच्य शिवीगाळ केली सरकारच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस यंत्रणेने धुडगूस घालणाऱ्या गुंडांना अटक करण्याऐवजी शांतता प्रिय मार्गाने नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या विभागाच्या HOD यांना अटक केली. परंतु या देशामध्ये कुणाच्याही दबावाला न जुमानता स्वतंत्रपणे व स्वायत्त्यपणे काम करणारी न्यायपालिका अस्तित्वात आहे त्याच न्यायपालिकेत दाद मागत लेखक व दिग्दर्शकाच्या वतीने अॅड. कौस्तुभ पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला व सदर नाटक हे कुठलाही प्रकारे धर्माच्या भावना दुखावणाऱ्या नसून पात्रे दर्शविणारा आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले अटकेच असणाऱ्या कलाकारांना एका दिवसात जमिनावर मुक्त केले.
आज या देशाचे नेते श्री राहुल गांधी हे अनेक अडचणींचा सामना करून या देशातील शेवटच्या घटकापर्यंतच्या न्यायासाठी संघर्ष करत आहे व संविधानाचे रक्षण व्हावं यासाठी हजारो किलोमीटरची पदयात्रा करीत आहेत आज अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आम्ही श्री राहुल जी गांधी यांचीच भूमिका पुढे नेत आहोत व या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करीत आहोत ती कार्यक्रमास धुडगूस घालणाऱ्या सर्व गुंडांवर कडक कारवाई व्हावी व सरकार आणि शासन हे विद्यार्थी व मुली यांच्यावर कुठलाही प्रकाराचा अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेतील अशी हमी आम्हाला देण्यात यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना काग्रेस पक्षाचे महीला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, टीडीफ संघटनेचे संदीप घोरपडे, प्रा.अशोक पवार,काग्रेस पक्षाचे तथा खा.शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,
बन्सिलाल भागवत,प्रा.जयश्री साळुंखे, प्रकाश निकम, एस.डी देशमुख, अनिल पाटील ,दिलीप पाटील, शेख शिबीना ,हिरामण कंखरे ,राजू शेख, सुनील महाजन ,धनगर दला पाटील ,सनी गायकवाड, श्रीमती वानखेडे, सौ एस वाय वंजारी, प्रकाश माळी, जयवंत पवार ,सुरेश पाटील ,बापूराव ठाकरे, .डी.ए धनगर, शिवाजी पाटील, गुणवंत पाटील, डॉक्टर अशोक बाविस्कर, उमेश काटे ,नंदकिशोर निकम, नरेंद्र घोरपडे ,प्रा गौतम मोरे, गुणवंत पवार, महेश पाटील ,सचिन वाघ, विठ्ठल पाटील, सह अनेक सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते…

