दहीगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्याच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी केले सादर
![]()



दहीगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्याच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी केले सादर
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ता.यावल शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत राजस्थान राज्याची संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी सादर केले.
विद्यार्थ्यांनी राजस्थानी पेहराव करून तेथील लोकसंस्कृतीची माहिती जसे पोशाख, बोलीभाषा, खाद्यपदार्थ तेथील गड किल्ले राजे राजवाडे व तेथील विशेष बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली.
तसेच तेथील प्रसिद्ध असलेले विविध लोक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली.
राजस्थान मधील प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास तालुक्याचे गटविकास अधिकारी आदरणीय डॉक्टर मंजुश्री गायकवाड मॅडम तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री विश्वनाथ धनके साहेब दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री विजय ठाकूर दादा गावचे सरपंच श्री अजय भाऊ अडकमोल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन अडकमोल व सर्व सदस्य पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

