1 min read

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनांक 04/02/2024 रोजी कर्जोद ता. रावेर येथे पार पडलेल्या समारंभात मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श सन्मान सोहळा निमित्त रविवार रोजी श्री आनंदा बापू धनगर सर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, विविध क्षेत्रात केलेले कार्य भूषणावह व प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजाची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ त्यांचे कार्य विधायक व कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकीने सेवा करतात. म्हणून श्री ए बी धनगर सर यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवपूर्वक प्रधान करण्यात आले.
त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्र परीवाराने अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *