1 min read

१८वे विद्रोही साहित्य संमेलनात लेखन साहित्यासह चित्र शिल्पातून दिसला विद्रोह

Loading

१८वे विद्रोही साहित्य संमेलनात लेखन साहित्यासह चित्र शिल्पातून दिसला विद्रोह

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथे शनिवार दि. 3 फेब्रुवारी २०२४ रोजी १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. चित्रकार केकी मूस दृश्य कलादालनातून विविध कलाप्रकारांनी पहिल्या दिवशी संमेलनात सप्तरंगांची उधळण झाली.
कलादालनात चित्रकार से.नि. प्राचार्य राजेंद्र महाजन (चोपडा), विकास शेलकर (पिंपळी),पद्माकर कोळी(चोपडा), जितेंद्र साळुंखे (चोपडा),लक्ष्मीकांत सोनवणे (शिंदखेडा), पंकज व वसंत नागपुरे बंधू (चोपडा),श्रीराम पवार(धुळे), निलेश शिंपी (पाचोरा), परशुराम पवार (पाचोरा),प्रा.कासार व चित्रकला महाविद्यालय(अमळनेर), कागद काम-दिलीप पाटील(अमळनेर),दीपक वाघ (अमळनेर),
पुतळा निर्मिती-मिलिंद निकम, नितीन सोनवणे, अजय विसावे(अमळनेर),
प्रत्यक्ष प्रात्यक्षिके- प्राचार्य राजेंद्र महाजन(चोपडा),राजू बाविस्कर(जळगाव ),श्याम कुमावत(नशिराबाद),पंकज नागपुरे वसंत नागपुरे(चोपडा), परशुराम पवार(वरसाडे तांडा), निलेश शिंपी(नगरदेवळा),
फलक लेखनरेखन प्रात्यक्षिक-मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार(शिरपूर),चतुर्भुज शिंदे(शहादा),
शिल्पकाम प्रात्यक्षिक -प्राचार्य अतुल मालखेडे(खिरोदा), निरंजन शेलार(जळगाव),
प्रत्यक्ष व्यक्तिरेखांकने – ललित कला भवन,खिरोदा येथील विद्यार्थी अतुल राठोड,महेश पाटील,तुषार राठोड यांनी आलेल्या कला रसिकांचे प्रत्यक्ष व्यक्तिरेखांकने विपूल प्रमाणात केली.अशा विविध कलांमधून संमेलनात विद्रोह पहावयास मिळाला.
कलावंत आपल्या मनातील भावभावना,उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या चित्रांतून कसा मांडू शकतो याची दृश्य कल्पना कला रसिकांना येथे अनुभवयास मिळाली. दिवसभरात हजारो कलारसिकांनी व लेखक कवींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला.या केकी मूस दृश्यकला दालनाचे मुख्य संयोजक कलाशिक्षक आर.एन‌.पाटील(धरणगाव),मिलिंद निकम(साळवे) तर कला प्रदर्शंनाची कलात्मक मांडणी अजय विसावे, नितीन सोनवणे(अंमळगांव),श्रावण सोनवणे(ढेकू),, दीपक वाघ(अमळनेर),आर.डी.चौधरी(कळमसरे),आर.बी.पाटील(अमळनेर), मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये -मुख्याध्यापक मनोहर महाजन(अमळनेर )होते.
मराठी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागत अध्यक्ष व साहित्यिक, पत्रकार, शिक्षक ,सामाजिक, राजकीय, अधिकारी यांनी भेटी दिल्या….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *