1 min read

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.

Loading

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.

अमळनेर – 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल ठरतोय सर्वात आकर्षित. या ठिकाणी आम्ही कोणाची वंशज ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाले याच निमित्ताने या स्टॉल वरती दुर्मिळ शिवचरित्र ,बखर, शिवभारत ग्रंथ, सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत .तसेच प्रभू श्रीराम यांचे दोन विशेषांक महिमा श्रीरामाचा आणि असं साकारतेय राम मंदिर हे विषय अंक देखील उपलब्ध आहेत. पहिल्या दिवसापासून या साहित्य संमेलनातील विविध स्टॉल वरती साहित्यिकांची तसेच नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत आहे .त्यात या वार्ता पत्राच्या स्टॉलचे एक वेगळे आगळे वैशिष्ट्य असल्याने अनेक साहित्यिक ,विद्यार्थी, शिक्षक कॉलेजमधील तरुण, तरुणी व विविध क्षेत्रातील नागरिक भेट दिली होती. त्यात श्री बीबी ठाकरे कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील शिक्षक प्रल्हाद पाटील निरंजन पेंढारे तालुका संघ चालक डॉ चंद्रकांत पाटील, तालुका प्रचारक कृष्णाजी कुलकर्णी,अशोक पाटील, प्रा. धनंजय चौधरी इत्यादी भेटी दिल्या होत्या.तसेच सांस्कृतिक वार्तापत्र चे विक्री अधिकारी श्री निखिल वझे यांनी सांस्कृतिक वार्तापत्र च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिनदर्शिका विषयी माहिती दिली सोबत विक्री अधिकारी श्री किरण देशमुख हे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *