1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव शाळेत कब बुलबुल युनिटीने केली
स्वच्छता

Loading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव शाळेत कब बुलबुल युनिटीने केली
स्वच्छता

अमळनेर प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ,ता.यावल ,जि. जळगाव येथे दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कब बुलबुल उपक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व कब युनिट व बुलबुल युनिट गणवेशात हजर होते .सर्व फ्लॉक लीडर यांनी कब व बुलबुल युनिटला मार्गदर्शन केले. सर्वप्रथम कब बुलबुल ची प्रार्थना घेऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बुलबुल गीत , घेर गीत झाले .तसेच संपूर्ण शालेय आवाराची साफ-सफाई सर्व कब बुलबुल युनिटने केली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *