दहिगाव शाळेत पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर कार्यशाळा
![]()

दहिगाव शाळेत पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर कार्यशाळा
अमळनेर प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत,पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लॅस्टिकचा वापर शाळेत होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यासाठी ,कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे 29 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी घरातील कापडाचा वापर करून सुंदर पिशव्या तयार केल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

