साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबिर
![]()


साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबिर
अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर विक्रांत पाटील व डॉक्टर प्रियांका शिंदे यांना शाळेत बोलवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉक्टर ए जे शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंतराव पाटील एडवोकेट अशोक बाविस्कर भास्करराव बोरसे किरण पाटील व मुख्याध्यापक सुनील पाटील हजर होते.
डॉक्टर विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाबद्दल मधुमेहाबद्दल स्थूलतेबद्दल डोळ्यांच्या आजारांबद्दल तसेच बदलत्या जीवनशैलीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले पाहिजे याबद्दल सविस्तर सांगितले. तसेच डॉक्टर प्रियंका शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली पाहिजे. चांगल्या गोष्टींचा अंगीकार करून मोबाईलचा वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले सूत्रसंचालन शिक्षक डी ए धनगर तर आभार प्रदर्शन देवेंद्र महाजन यांनी केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर ए जे शेख यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आहार व झोप याचे नियोजन केले पाहिजे. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बाधित विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला देऊन पुढील मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आले.

