1 min read

अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप

Loading

अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
काळानुरूप आधुनिक बदल स्वीकारून व्यक्ती विकास साधण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे आणि या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा शिक्षक आहे..एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि शिक्षण आत्मसात करणे व भविष्याला दिशा देणारे सुजाण नागरिक घडविणारे एक पाऊल भविष्यवेधी शिक्षणाकडे वाटचालीसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाची गरज आहे असे तज्ञ मार्गदर्शक यांनी सांगितले.सदर प्रशिक्षण घेऊन आता आपण प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार झाले आहेत. आपल्या वर्गात सदर प्रक्रिया राबविण्यात यावी असे सांगितले..आज सोमवारी २९ जानेवारीला पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा प्रताप हायस्कूल मध्ये समारोप करण्यात आला.
व्यासपीठावर तंज्ञ मार्गदर्शक तथा केंद्र
भगवान पाटील, चंद्रकांत साळुंखे, देवेंद्र पाटील होते. कार्यक्रमाचे सविस्तर प्रस्ताविक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उमेश काटे सर यांनी केले.
या प्रशिक्षणात मी काम का करतो?
पिसा रेडी मूल तयार करणे व सहा सी जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे.. त्यासाठी अगोदर शिक्षकांनी आपल्या व्यवसायात अपडेटेड राहणे गरजेचे आहे… प्रशिक्षणात अध्ययन गती पातळीचे व्हिडीओ च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात आलेल्या अनुभवावर शिक्षक किशोर बडगुजर,सौ वर्षा पाटील मॅडम ,आर्मी स्कूलचे शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
समारोपामध्ये तंज्ञ मार्गदर्शक केंद्रप्रमुख भगवान पाटील, चंद्रकांत साळुंखे,विषय तंज्ञ देवेंद्र पाटील यांचा ब्लॉक क्रमांक 1 च्या वतीने सत्कार करण्यात आला…
हे तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूल येथे दिनांक २३ जानेवारी २०२४ ते २९ जानेवारी२०२४ दरम्यान सुरू होते.ब्लॉग क्रमांक 1मध्ये जिल्हा परिषद, माध्यमिक,नपा,आश्रम कर्मचारी उपस्थित होते…
यावेळी समारोपाचे आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक गोपाल हडपे यांनी केले.. यावेळी गांधली पिळोदा विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एन वाय पाटील,ईश्वर महाजन,संजय पाटील,ए.एन मालचे ,श्रीमती एस.पी अहिरे,नंदा पाटील मँडम,एच ओ माळी,दिनेश टाक, राहुल पाटील, आर जी देवरे ,आर एस बोरसे,दिनेश पाटील, राकेश पवार,निलेश शर्मा,रोहिदास महाजन सह प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *