1 min read

अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब अंगणवाड्या मध्यें मुलांचा किलबिलाट सुरू

Loading

अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब अंगणवाड्या मध्यें मुलांचा किलबिलाट सुरू
महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणभानुदास पाटील संघटक – सचिव
. मुंगसे ता अमळनेर दि२६ (वार्ताहर ) दि ४ डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होता . मुंबई येथे मंत्रिमंडळाची नुकतीच झालेल्या बैठकीत मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आलेला आहे .त्यात खालील प्रमाणे मागण्यांचे मान्य झालेल्या आहेत
शासनाने अंगणवाडी ।कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन योजना व ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी संप मागे घेतला.
मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर, सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून, मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला.
मुंबईतील बैठकीत कृती समितीचे पदाधिकारी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दत्ता देशमुख, दिलीप उटाणे, माधुरी क्षीरसागर, निशा शिवरकर उपस्थित होते. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे सांगितले. तसेच कृति समितीच्यावतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देणार !

मोबाईल हॅण्डसेट तत्काळ देणार !
मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार

कोरोनाकाळात तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीमध्ये केलेले काम संपकाळात समायोजित करावे, त्याद्वारे संपकाळातील मानधन अंगणवाडी सेविकांना मिळेल, यावर सकारात्मक विचार :!
दहावी उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देणार !

दिड महिना अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू होता. मुंबईतील बैठकीत मागण्‍या झाल्‍या मान्‍य झाल्याचे भानुदास पाटील संघटक सचिव जळगाव – धुळे जिल्हा.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ . यांनी कळविले असूनअंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व महिला कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *