गझल म्हणजे कवितेच्या प्रांतातील पुढचं पाऊल!!
![]()

गझल म्हणजे कवितेच्या प्रांतातील पुढचं पाऊल!!
अमळनेर आज पासून गझल मुशायरा सुरू होत आहे .अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्टा याला स्थान न दिल्याने गझलकारांनी आपले स्वतंत्र गझल संमेलन अमळनेरात भरविले आहे .गझल म्हटले की त्यात शृंगारिकता असते असे मानले जात होते .परंतु गझल ही समाजाची वेदना मांडते हे आज सिद्ध झाले. गझल हीअरब देशातून आलेली काव्यधारा आहे. गझलमध्ये अनेक प्रकार आहेत. बऱ्याच प्रकारापर्यंत गझलकार जाऊ शकले नाही इतकी ती खोल आहे .गझल ही प्रबोधनाची हाक आहे . वेदना मांडण्याचं दालन आहे. अनेक कवी गझलेला कमी लेखतात परंतु गझल लिहिणे इतके सोपे नाही .एक शेर त्यात सूक्ष्म मतितार्थ दडलेला असतो. गझल समजून घेणे चांगल्या कवीची परीक्षा आहे .गझल ही जरी शृंगारिक कथनासाठी निर्माण झाली असेल परंतु तिला अनेक कांगोरे फुटलेले आहेत .सुरेश भटांनी गझल साठी अनेक कष्ट घेतले .जोपर्यंत गझल त्यांना अवगत होत नाही. तोपर्यंत त्यांनी गझलेला सुरुवात केली नाही .सुंदर अनेक विचाराची गुंफण म्हणजे गझल होय गझ लेच्या अनेक छटा दिसून येत असल्या तरी तिला मांडण्याची प्रत्येकाची वेगळी हातोटी आहे. त्यामुळे असंख्य प्रकार त्यात दिसून येतात .ज्याप्रमाणे लावणी ला अनेक विषय असू शकतात त्याप्रमाणे गझलेला अनेक विषयाचे गुंफण घालता येते. हृदयाच्या स्फुरलेल्या भावनांची अप्रतिम रूप गझल असते. अशा गझलेला अखिल भारतीय साहित्य संमेलनात स्थान मिळाले नाही .साहित्य म्हटलं की त्यात बऱ्याच गोष्टी येतात. काही लोकांना कविता आणि गझल यात फारकत करण्याची सवय असते. गझल ही काल्पनिकता सोडून वास्तवता मांडत असल्याने काही कल्पनातीत मानवी करणाऱ्या कवींना ती आवडत नाही .त्यामुळे काही कवी गझलेला महत्व देत नाही आधुनिक काळात गझ लेला चांगले दिवस आले आहेत .अनेक नव साहित्यिक जुने साहित्यिक यांनी गझ लेसाठी खूप कष्ट घेतले आहे. यमकाची वारंवारिता गझलमध्ये येत असल्याने गझल ऐकण्यास सुंदर वाटते. गझल तयार करणे तितकेसे सोपे नाही .बरेच लोक गझ लेच्या प्रांतात पूर्ण सामावलेले नसतात .परंतु थोड्या अंतराने सुद्धा गझल त्यांना नवा आयाम देऊन जाते .उर्दूतून हिंदीतून मराठीतून गझल निर्माण होऊ लागली आहे .भाषेची सुंदर लयबद्धता गझलमध्ये दिसून येते .गझलकार गझल म्हणताना धुंद होऊन जातो. आपली वेदना स्पष्टपणे मांडतो .आपली व्यथा आपल्या व्यक्तीकडे मांडण्याची उत्तम माध्यम हे गझल आहे .अमळनेर गझले साठी नामांकित गझलकार आलेले आहेत .गझलेच्या ह्या विविध प्रकाराची रचना रसिकांना ऐकता येईल. त्यासाठी अमळनेरातील सर्व रसिकांनी याचा लाभ घेतला पाहिजे .गझलेच्या प्रांतात जाऊन शब्दाने ओलेचिंब न्हाले पाहिजे .पुन्हा पुन्हा ही गझलेची गंगा एवढ्या प्रवाहाने पाहायला, अनुभवायला मिळणार नाही त्यासाठी रसिकांनी याचा लाभ घ्यावा.
पत्रकार
एस.एच. भवरे
9284695140

