1 min read

चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Loading

पारोळा प्रतिनिधी-आज दि.२६/०१/२०२४ वार-शुक्रवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी दादासो. श्री. बाळासाहेब पाटील(जेष्ठ पत्रकार, पारोळा),दादासो.श्री सुभाष पाटील (से. नि.D.O JDCC Bank), दादासो.श्री.परेश सौपुरे(शाखाधिकारी HDF Finance, Jalgaon),आप्पासो.श्री.गणेश महाजन ,संस्थेचे अध्यक्ष आण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो.श्री.बाळासाहेब पाटील(जेष्ठ पत्रकार,पारोळा)हे होते.अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष आण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सर यांनी प्रास्ताविक केले.शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती.वैशाली पाटील मॅडम यांनी छान गीत गायन केलं.त्यानंतर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी छान-छान देशभक्तीपर नृत्य सादर केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले.तर आभारप्रदर्शन श्री.प्रताप पाटील सर यांनी केले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.त्यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *