ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
![]()

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अमळनेर:- ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ॲड ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील प्राचार्य नीरज चव्हाण सर प्राचार्य प्रकाश महाजन सर उपप्राचार्य अश्विनी चौधरी पर्यवेक्षक जयश्री भोसले क्रीडा शिक्षक केदार देशमुख सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती
वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम स्पर्धा व क्रीडा महोत्सवात ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला व विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले त्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी अध्यक्ष ॲड ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गीत गायनाचा व नृत्याचा कार्यक्रम केला सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व मान्यवर यांनी उत्साहीत होऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील सर यांनी केले व आभार अहिरराव मॅडम व महाजन मॅडम यांनी मांडले मानले

