दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन
![]()

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी.. बचत मानवी जीवन जगतांना किती महत्त्वाची आहे याचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात जर दिले तर भविष्यकाळात त्यांना पैशाचे महत्त्व कळते असे दहिगाव जिल्हा परिषद च्या आदर्श मुख्याध्यापिका सरिता जाधव यांनी सांगितले…
दिनांक 23 जानेवारी २०२४ रोजी मंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले बँकेला चिल्ड्रन्स बँक म्हणून नाव देण्यात आले यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बँकेचे सर्व कामकाज उत्कृष्टरित्या हाताळले. यावेळी इयत्ता तिसरी व चौथी मिळून ४६ खाते असा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बँकेचे कामकाज हतळण्याविषयी मार्गदर्शन केले,

