प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![]()

प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
जळगांव प्रतिनिधी
दिनांक-२०जानेवारी २०२४ शनिवार रोजीचा रात्री काळाने मोठा घात केला आणि मन हेलवणारी दुःखद घटना एका DCPS धारका सोबत घडली,
प्राथमिक आरोग्य केंद्र-नशिराबाद उपकेंद्र-जळगाव खुर्द येथे
(वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी लागलेला) आरोग्य सेवक पदावर कार्यरत..
तसेच एक वर्षाच्या बहुउद्देशीय आरोग्य सेवक या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र मध्ये बॅच क्रमांक-५८ मध्ये प्रशिक्षण घेत असलेला…
स्वर्गीय.शेखर अशोक हिवरे वय ४० वर्षे
राहणार-शिरसाळ (साकळी) ता-यावल येथील मूळ रहिवासी
यांचे काल रात्री.. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
अविवाहित असुन,आई लहान भाऊ,बहीण असा परिवार आहे.
आमच्या या मृत सहका-याच्या मृतआत्म्यास चिरशांती लाभो तथा हिवरे परिवाराला हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती😢देवो.
समस्त जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी वर्ग यांच्या तर्फे मयत शेखरभाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली….


