अमळनेरला बाल साहित्य संमेलनाची
पूर्वतयारी…
![]()

अमळनेरला बाल साहित्य संमेलनाची
पूर्वतयारी…
अमळनेर प्रतिनिधी
मराठी साहित्य सम्पदा ही बालपणापासून जोपासली जावी म्हणून अमळनेर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व दिनी दि१ फेब्रुवारी ला बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पूर्व तयारीसाठी दि २०ला प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यशाळा घेण्यात आली. बाल मेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन,कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश.. यासाठी निवड झालेल्या मुलामुलींसाठी ही कार्यशाळा होती.
या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा इ.१०वी चा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद् घाटन आर.आर.माध्यमिक विद्यालय, जळगावची १०वी ची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची इ.९वी ची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर केले जाणार आहे.
या कार्यशाळेस प्रत्येक विद्यार्थ्याची कशी तयारी झाली आहे? काय बदल केला पाहिजे याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
बाल मेळावा समितीचे सदस्य संदीप घोरपडे, प्रा.प्रकाश धर्माधिकारी,गिरीश चौक,सौ वसुंधरा लांडगे,मिलिंद पाटील,भाऊसाहेब देशमुख,शिला पाटील,सारांश सोनार, कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहा एकतारे यांनी आभार मानले.

