1 min read

शालेय राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेंद्र शिर्केची निवड.

Loading

शालेय राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेंद्र शिर्केची निवड.

जळगाव: क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद धुळे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच शिरपूर येथील एच.आर.पटेल विद्यालयात पार पडलेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेतून नाशिक विभागाच्या जळगाव येथील के.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेंद्र दिपक शिर्के या विद्यार्थ्याची शालेय राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर राज्यस्तर स्पर्धा वसमत जिल्हा हिंगोली येथील मयूर मंगल कार्यालयात दि.२९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *