1 min read

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Loading

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज को ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबई.
सभासद पाल्य गुणगौरव समारंभ शाखा जोगेश्वरी व बोरीवली या संस्थेचा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उत्कर्ष विदयामंदिर, मालाड पुर्व मुंबई येथे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 125 विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमास स्वर्गीय मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री
वीरमाता सौ. ज्योती जयप्रकाश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होत्या.
श्री. सुधाकर बबन जगदाळे (उपाध्यक्ष) श्री. सतेश शहाजी शिंदे (खजिनदार ) श्री. सतिश ज्ञानदेव माने (सहसचिव) श्री गुलाबराव साहेबराव गवळे ( तज्ञ संचालक) संचालक किशोर पाटील या कार्यक्रमाला उपस्थीत होते. कौस्तुभ राणे यांच्या देशप्रेमाचा संस्कारामुळे त्यांच्या पत्नीही आज कॅप्टन या पदावर देशासाठी कार्यरत आहेत. देशप्रेमाचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व आजचे विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे ज्योती राणे यांनी केले.गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. संजय शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *