मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळाउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना “प्रथमोपचार पेटी “ओळख व वापर यांविषयी मार्गदर्शन शिबिराचेआयोजन
![]()

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळाउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना “प्रथमोपचार पेटी “ओळख व वापर यांविषयी मार्गदर्शन शिबिराचेआयोजन
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रमशाळा पिंपळे येथे दि १८ जाने.2024 वार गुरुवार रोजी विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधांसाठी प्रथमोपचार पेटीची ओळख व वापर या विषयी आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यात १)मुलांना आरोग्य विषयक माहिती व सुदृढ आरोग्यासाठी उपाय योजना
२) प्राथमिक आजार व त्यावरील प्राथमिक उपचार
३) प्रथमोपचार पेटी आणि त्यातील साहित्य ओळख
४) प्रथमोपचार पेटी तील साहित्य वापर यांचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करण्यात आले अशा पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सदर मार्गदर्शन शिबिरात प्राथमिक /माध्यमिक मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरेसर आणि श्री उदय पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती सदस्यांनी सहकार्य केले.

