1 min read

सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र भोळे यांचा राजस्थान येथे झाला सन्मान

Loading

डॉ. रवींद्र भोळे यांना राजस्थान गौरव सन्मान प्रदान
जोधपूर: सामाजिक,चिकित्सा, शिक्षा, पर्यावरण, कला क्रीडा संस्कृतीक ,अध्यात्मिक, धार्मिक वैद्यकीय सेवाभावी कार्ये, नैसर्गिक आपत्ती व कोरोना पंडेमिक कार्ये, इत्यादी महत्त्वपूर्ण समर्पित भावनेने ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी सेवाव्रती कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सारथी युथ फाऊंडेशन राजस्थान जोधपुर वतीने राजस्थान गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. सारथी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र गहलोत यांनी सांगितले की ग्रीनलँड रिसॉर्ट्स या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राजस्थान गौरव पुरस्कार, समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर किशन लढा, पार्षद डॉ. रवींद्र परिहार, नरेंद्र सिंह भाटी, अमरलाल वर्गी, धीरज चव्हाण, राजस्थान ब्राह्मण महासभा पूर्व अध्यक्ष कन्हैया लाल जी पारिक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष गौरव जैन, समाजसेवी लक्ष्मी शेखावत, कोरिओग्राफर लक्षिता व्यास, धनराज प्रजापत, फाउंडेशन के जिल्हाध्यक्ष पूजा सुराणा, जिल्हा उपाध्यक्ष राधिका कानूंगा, जिल्हा सचिव कुसुम सैन, राजू सा सुराना आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *