महाराष्ट्रात 22 जानेवारी 24 रोजी विशेष सुट्टी जाहीर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
शिक्षण आयुक्तालयाचे पत्र
![]()

महाराष्ट्रात 22 जानेवारी 24 रोजी विशेष सुट्टी जाहीर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
शिक्षण आयुक्तालयाचे पत्र
22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट— शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात आज परिपत्रक काढण्यात आले दरम्यान सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राज्यातील अनेक आमदार, मंत्री महोदयांनी
केली होती.
देशातील असंख्य हिंदू कारसेवकांचे बलिदान आणि रामभक्तांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे राम मंदिर आज पूर्णत्वास जात आहे. सोमवार 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा ऐतिहासिक असा आहे. साऱ्या देशात दिवाळी सण साजरा करण्यासाठी व सोहळ्याचा सर्व सामान्य नागरिकांना आनंद घेता यावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 22 जानेवारी 24 रोजी पूर्ण दिवस विशेष सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील पत्रक प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आले.
राज्यातील शैक्षणिक संस्था या दिवशी पुर्ण दिवस बंद राहणार आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाने या संदर्भात पत्रक जाहीर केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या अनोख्या सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता येईल असे मत प्राध्यापक धर्मेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले. रामभक्तांना एक अनोखा भव्य दिव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया आरती शर्मा यांनी व्यक्त केली.


