वरिष्ठ गट (पुरुष) अंतर राज्य हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन
![]()

वरिष्ठ गट (पुरुष) अंतर राज्य हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा.—
महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन वतीने आयोजित पुरुष खुला वयोगट राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा चंद्रपूर येथे
दि. 1 /2 / 2024 रोजी आयोजित केल्या आहेत,
तरी या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष (वरिष्ठ गट) हॉलीबॉल संघ सहभागी होणार आहे.
यासाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे,निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त वरिष्ठ खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आव्हान जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री चंद्रकांत सोनवणे तसेच उपाध्यक्ष डॉ. प्रदीप तळवेलकर आणि सचिव प्रा.डॉ.देवदत्त पाटील यांनी केले आहे,निवड चाचणी बद्दल अधिक माहितीसाठी जळगाव जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन सदस्य श्री.सुरज वराडे 8956812223.,श्री.सचिन पाटील 8208275992.,
श्री. जयेश मासरे 8485828244. यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेचे ठिकाण – साने गुरुजी माध्यमिक विद्यालय अमळनेर जि.जळगाव येथे राहील,दि. 21/ 2 /2024 रविवार वेळ दुपारी 2 वाजता असेल, सर्वांसाठी टीप खेळाडूंनी निवड चाचणीसाठी वेळेवर हजर राहावे,अन्यथा उशिरा येणाऱ्या खेळाडूंचा विचार केला जाणार नाही,असे कळविण्यात येत आहे.

