अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेची सहविचार बैठक संपन्न
![]()


अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेची सहविचार बैठक संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष रिक्त पदासाठी जिल्हा मानद अध्यक्ष श्री सुनील दगा पाटील यांच्या निरीक्षणाखाली साने गुरुजी सभागृह पंचायत समिती अमळनेर येथे सकाळी ठीक10:00वाजता सभा संपन्न झाली. त्यामध्ये श्री संजय भाईदास पाटील यांची अमळनेर तालुका अध्यक्ष म्हणून व श्री विलास गुलाबराव पाटील यांची कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल शुभेच्छा देताना अमळनेर तालुका ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक बंधू भगिनी व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

