नूतन मराठा महाविद्यालयात
“लेखक आपल्या भेटीला ” उपक्रमाचे आयोजन संपन्न..
![]()


नूतन मराठा महाविद्यालयात
“लेखक आपल्या भेटीला ” उपक्रमाचे आयोजन संपन्न..
नूतन मराठा महाविद्यालय आणि मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “लेखक आपल्या भेटीला” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी एफ.वाय.बी.ए. च्या अभ्यासक्रमातील “दप्तर” या कथेचे लेखक प्रा.राहूल गोविंद निकम, मराठी विभाग प्रमुख प्रा.ललिता हिंगोणेकर, प्रा.अर्जून पाटील आणि प्रा. रत्नाकर कोळी व्यासपीठावर उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने करुन
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून
पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची भुमिका मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केली.
लेखकाचा परिचय प्रा. रत्नाकर कोळी यांनी करुन दिला..
प्रा.राहूल निकम यांनी मराठी भाषेची वाटचाल स्पष्ट करुन मराठी भाषेचे महत्त्व आणि तीचे जतन-संवर्धन करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवणे अत्यंत आवश्यक आहे.असे सांगितले..
जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेकडे मराठी माणूस वळत नाही ,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मातृभाषेतून ज्ञान संपादन केले तर विद्यार्थ्यांना लवकर आकलन होते,म्हणून मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे .असे आवाहन करुन त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला..
अध्यक्षीय मनोगतात डॉ. के.बी.पाटील यांनी लेखक होण्यासाठी खुप मोठी साधना आणि प्रतिभा असावी लागते आणि या लेखनाच्या आणि जनसंवादाचे माध्यमातूनच कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि संत गाडगेबाबा यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आली आणि असे प्रतिभावान लेखक तुम्हाला भेटायला आले म्हणून तुम्ही खुप भाग्यवान आहात .असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या..
सुत्रसंचलन प्रा.स्वाती कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन नितूषा पुंडे या विद्यार्थिनीने केले..
या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..

