1 min read

कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन

Loading


कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन
मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाला प्रा.म.ना.अदवंत, प्रा.राजा महाजन,प्रा. सु.का.जोशी,डॉ.इंदुमती लिमये अशा थोर साहित्यिक प्राध्यापकांची वाड़मयीन समृद्ध परंपरा आहे.त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ना.धो.महानोर,डॉ.किसन पाटील,केशवसूत पुरस्कारप्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर,डॉ.साहेबराव भूकन,डॉ.वासुदेव वले,डॉ.प्रकाश सपकाळे, प्रा.धनराज धनगर,नामदेव कोळी,मोरेश्वर सोनार,प्रा.गोपीचंद धनगर अशा विद्यार्थी देखील समृद्ध परंपरा उत्तरोत्तर वर्धिष्णू करीत आहेत.अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून महाविद्यालयाने दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेतले पाहिजे. संस्थापक पितृतुल्य मूळजी जेठा यांच्या नावाने साहित्यिक पुरस्कार दिले पाहिजे. परिणामी सृजनशील साहित्यिक निर्माण होऊन खानदेशची साहित्य परंपरा उत्तरोत्तर वर्धिष्णू होईल. कॉलेजचा ‘ अजिंठा ‘ वार्षिकांक हा वाड़मयीन त्रैमासिक नियतकालीक म्हणून प्रकाशित करावे असे विनम्र आवाहन माजी विद्यार्थी म्हणून कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी द्रष्टेपणाने केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी,भाषा व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे,दैनदिन जीवनव्यवहारात काव्य व साहित्य नेहमीच बळ देत आले आहे,मराठी भाषेतून रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले.याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील,डॉ.योगेश महाले,डॉ.विलास धनवे,प्रा.संजय हिंगोणेकर,डॉ.जयेश पाडवी,डॉ.अतुल पाटील,प्रा.रेणुका झांबरे,विजय लुल्हे व महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *