1 min read

राज्यस्तरीय अँबबॅकस स्पर्धेत आदेश अँबॅकस क्लासचे विद्यार्थी चमकले

Loading

राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत आदेश अॅबॅकस क्लासचे विद्यार्थी चमकले

अमळनेर : येथील आदेश अँबॅकस क्लासच्या संचालिका सौ. सोनल निलेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली

जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अँबॅकस स्पर्धेत अमळनेर येथील A१ गटात आरव संदीप पाटील याने १०० गुणांचा पेपर ४.५२ मिनिटात सोडवून १०० पैकी १०० गुण घेत राज्यस्तरीय स्पर्धेत टॉप टेन मध्ये धडक दिली. तर दक्ष भगीरथ पाटील या विद्यार्थ्याने ९९ गुण मिळवत आदेश अॅबॅकस क्लासचा गौरव वाढवला. सदरची परीक्षा ही ८ मिनिटांची होती. या परीक्षेत आरव पाटील याने ८ मिनिटांपैकी केवळ ४.५२ मिनिटात, तर दक्ष पाटील याने ७.३८ मिनिटात आणि मृगमयी अविनाश पाटील हिने ८.०० मिनिटात पेपर सोडवला. या तिघं विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले.

राज्यस्तरीय स्पर्धेच्या A२ गटात आदेश अँबॅकस क्लासचे कुमुद हेमंत मगर ८८% गुण तर गार्गी प्रविण पवार ७०% गुण व प्रणव योगेश पाटील ५१% गुण मिळवत अमळनेर चे नाव चमकवले. सदरच्या परीक्षेत जिल्ह्यातील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आदेश अँबॅकस क्लासच्या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात सहाचे सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना आदेश अॅवॅकस क्लासचे सहाय्यक श्री. निलेश मगर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *