1 min read

शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता.

Loading

शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता.

जळगाव: येथे नुकत्याच क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांगली विभाग व नाशिक विभाग यांच्यात अंतीम सामना खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाशिक विभागाच्या जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सांगली विभागावार मात करीत दिमाखात विजेतेपद पटकावले.
विजयी संघात दिव्या ठाकरे, करीना भोपे, आदिती पाटील, दिव्या झोपे, तुलसी कुलकर्णी, सेजल पाटील, खुशी गुजर, विनिता पाटील, अक्षदा तायडे, दुहिता पाटील, प्रेरणा गायकवाड, नित्यांजली सोनवणे यांचा समावेश होता. विजेत्या संघाला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे के. सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे,प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *