1 min read

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी आयोजन.

Loading

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी आयोजन.

जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शून्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यावर योग्य उपचार केले जातात. त्या अनुषंगाने आज येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११वी,१२वीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींची शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यात विद्यार्थ्यांची सामान्य आरोग्य तपासणी करून गंभीर आजाराची लक्षणे आढल्यास त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील DEIC केंद्रास भेट देण्यास संदर्भित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपप्राचार्या श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर. बी. ठाकरे,समन्वयक प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वैद्यकीय पथकात डॉ.अजय झोपे, डॉ.उमेश पाटील, डॉ.लोकेश चौधरी, डॉ.प्रिती नारखेडे, डॉ.लीना बडगुजर, डॉ.श्रुती चौधरी यांचेसह औषध निर्माण अधिकारी श्री.जितेंद्र देसले व श्री.पंकज कुलकर्णी, परिचारिका जयश्री चौधरी, आरती पाटील व दीप्ती वाविकर यांचा समावेश होता. सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *