1 min read

आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात…

Loading

आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात…

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक/ यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता-अमळनेर जि-जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत दि.12 जानेवारी 2024 वार- शुक्रवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकासासाठी मुलींसाठी "जिजाऊ चषक" व मुलांसाठी "युवा चषक" टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर येथील खा.शि.मंडळाचे विश्वस्त व प्रमुख वक्ते सौ.वसुंधरा लांडगे मॅडम, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा, माईसो सौ.विद्याताई पाटील मॅडम, संस्थेचे सचिव व शैक्षणिक सल्लागार नानासो श्री.युवराज दगाजीराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उच्च माध्यमिक शिक्षक श्री.स्वप्निल एच.पाटील व क्रीडा समिती यांच्या तर्फे करण्यात आले. सदर स्पर्धेतील विजयी संघाना प्रथम, द्वितीय, तृतीय व वैयक्तिक असे अनेक रोख व चषक स्वरूपात 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण व पारितोषिके देण्यात येणार आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांचे 10 तर मुलींचे 8 असे एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय पाटील, तसेच श्री.चेतन पाटील, श्री.हेमंत पाटील, श्री.स्वप्निल पाटील, श्री.गंगासागर वानखेडे, श्रीमती सविता मुळे, श्री.मुकेश पवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विदयार्थी उपस्थित होते. सदर क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समिती सदस्य श्री.दिपक नांद्रे, श्री. राहुल पाटील तसेच उच्च माध्यमिक शिक्षिका श्रीमती माधुरी पाटील व प्राथमिक शिक्षक श्री.नितीन सोनवणे यांचे सहकार्य लाभले. अतिशय उत्कृष्ट क्रिकेट लिगचे आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे कौतुक करण्यात आले. आश्रमशाळेतील सर्व खेळाडू यांच्यासह परिसरातील क्रिकेटप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *