1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदन

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदन
राज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.
आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने संप सुरूच आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकामंत्री मा. गिरिशभाऊ महाजन आज नेरी ता. जामनेर येथे विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठीं आले असता संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या तालुका प्रतिनिधी सौ.रेखा नेरकर आणि सौ.शकुंतला चौधरी यांनी मागण्यांचे निवेदन देत संपावर तोडगा काढण्याची विनंती केली.
यावर मंत्री महोदयांनी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जामनेर तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *