1 min read

शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा

Loading

शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा
शिरसाळे तालुका अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे १४ जानेवारी हा राष्ट्रीय भूगोल दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जगतराव शंकर पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पी ए भदाणे एम बी सोनार के पी संदानशिव एन आर जैन आर आर पाटील पी आर पवार एस आर ठाकरे एस बी चौधरी आर एन साळुंखे डी डी धनगर हे व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेतील शिक्षक व भूगोल अभ्यासक विजयसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना भूगोल दिनाचे महत्त्व पटवून सांगितले भूगोल दिन का साजरा केला जातो मकर संक्रांति म्हणजे काय दक्षिणायन उत्तरायण सूर्याचे राशी भ्रमण अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. संस्थेचे सचिव जगतराव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून व मेहनत करून जीवनात यशस्वी व्हावे असा सल्ला दिला. तसेच भूगोल शिक्षक पी आर पवार यांच्या संकल्पनेतून १४ जानेवारी भूगोल दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांची एक साखळी तयार करून भारताचा उबेहूब नकाशा शाळेच्या मैदानावर तयार करण्यात आला नकाशा अतिशय अप्रतिम रित्या तयार करण्यात आला अशा प्रकारे एक आगळावेगळा पद्धतीने भूगोल दिन साजरा करण्यात आला. शिक्षक श्री एस आर ठाकरे यांनीही आपल्या मनोगतातून भूगोल दिनाचे व मकर संक्रांतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले. सूत्रसंचालन एस आर ठाकरे यांनी केले तर एस बी चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *