1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय

कृतीयुक्त सहभाग

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर ,येथे मराठी विषय शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर यांच्या संकल्पनेतून इ. ९ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात निरोप कवितेचा उपक्रमाच्या माध्यमातून कृतियुक्त साजरा केला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या . व्यासपीठावर सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते . प्रास्ताविक मराठी विषय शिक्षक श्री मुकेश पाटील सर यांनी केले . त्यानंतर आईची व सैनिक मुलाची वेशभूषा करणाऱ्या मुलींनी आपल्या सैनिक मुलाचे औक्षण करून , आपल्या सैनिक मुलाला निरोप देण्यात आला . सैनिकाची वेशभूषा करण्यात कोमल पाटील , किरण पाटील , नेहा पाटील , नुतन पाटील यांनी तर आईची वेशभूषा – संध्या गजरे प्रेरणा पाटील, वैष्णवी पाटील व डिंपल पाटील यांनी साकार केल्या . अध्यक्षीय भाषणात मुख्या . श्रीमती बोरसे मॅडम यांनी सैनिकाचे जीवन त्याच्या मुलांना विचारा , शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी चे वडील सैन्यात आहेत ,त्यांना आपले मनोगत व्यक्त करणाची संधी दिली . मार्गदर्शन केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी इ. ९ वी ‘अ ‘ च्या विदयार्थीनीं सहकार्य केले . सुत्रसंचलन मानसी पाटील व आभार प्रदर्शन कोमल चौधरी यांनी केले . कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील , सचिव श्री . संदिप घोरपडे सर , उपाध्यक्ष श्री . गुणवंतराव पाटील , शालेय समिती अध्यक्ष श्री . प्रा .डॉ. शेख सर व मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *