ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा…
![]()
ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा…
ग्रामविकास मंचाच्या पदाधिकारी यांचे सरपंच व पंचायत समितीला निवेदन….


अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर गाव व सुंदर शाळा हा उपक्रम राबवत असतांना ढेकू खुर्द गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर अवस्था थांबवून शाळेला कंपाऊंड व गेट व शाळेचा भौतिक परीसर चांगला व्हावा यासाठी ढेकू येथील ग्रामविकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्याकडे मागणी केली आहे…
शाळेला वॉल कंपाऊंड नसल्या कारणाने पिसाळलेल्या कुत्र्यामुळे व मोकाट फिरत असलेल्या जनावरं मुळे शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रस्त्या लगतच शाळा असल्याने शाळेचे कुलूप तोडणे,साहित्याची चोरी करणे ह्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.. तत्संबंधी शालेय मालमत्तेचे खूप नुकसान होत आहे. ह्याची ग्राम विकास मंच ढेकू खुर्द च्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन लेखी निवेदन सरपंच व पंचायत समिती मध्ये दिले व कामास लवकर मार्गी लावण्यासाठी सांगितले.निवेदनावर सहया आहेत.
अविनाश श्रावण पाटील,रोहित मुरलीधर पाटील,प्रकाश श्रीराम पाटील,धर्मेंद्र वामन पाटील हर्षदीप अशोक पाटील,अरुण पुंजू पाटील नंदकिशोर जिजाबराव पाटील,
नितीन सुभाष पाटील व इतर ग्रामस्थांनी उपस्थित ग्रामस्थ व ग्राम विकास मंच चे कार्यकर्ते यांनी निवेदन तसेच समस्या जाणून घेतल्या.

