साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मराठी विषयातील पाठाच्या माध्यमातून पाड्यावरचा चहा शाळेवर आदिवासी जीवन कृतीतून साजरा .
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मराठी विषयातील पाठाच्या माध्यमातून पाड्यावरचा चहा शाळेवर आदिवासी जीवन कृतीतून साजरा .
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर ,येथे मराठी विषय शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर यांच्या संकल्पनेतून इ. ८ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘पाड्यावरचा चहा ‘ हा पाठ प्रत्यक्ष कृतीतून शाळेवर अवतरला ‘आदिवासी पाडा ‘ या उपक्रमाच्या माध्यमातून इ. ८ वी ‘ ब ‘ विद्यार्थानीनी प्रथमतः साडी च्या सहाय्याने झाडांखाली झोपड्या तयार करून बाजुला विटा , दगड जमवून चुल मांडली , नंतर घरून आणलेले दूध , चहा पावडर व इतर साहित्य जमवून , इतरत्र सरपण (लाकडे ) गोळा करून छानपैकी चहा बनवला . त्याबरोबर च काहींनी पराटे , पोहे, कळण्याच्या भाकरी – ठेचा , भेळ , फापडा अशी भरपूर खाद्यपदार्थ शाळेतच तयार केले . सदर उपक्रम पाककलेची आवड व्हावी . साने गुरुजी कन्या हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम व सर्व जेष्ठ शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते . प्रास्ताविक मराठी विषय शिक्षक श्री मुकेश पाटील सर यांनी केले . नुतन माध्य विदयालयाचे मुख्याध्यापक श्री . सुनिल पाटील सर व जेष्ठ शिक्षक व शिक्षिका यांनी भेट दिली . कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील , सचिव श्री . संदिप घोरपडे सर , तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री . रावसाहेब पाटील , उपाध्यक्ष श्री . गुणवंतराव पाटील , शालेय समिती अध्यक्ष श्री . प्रा .डॉ. शेख सर , अमृत बाजीराव पाटील , किरण पाटील , बोरसे आबा व सर्व संचालक मंडळ यांनी भेट देवून चहा व खादय पदार्थांचा आस्वाद घेतला . सर्व प्रमुख पाहुणे , संचालक मंडळ , मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले .



