पोलीस वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे बंडपथक विद्यार्थी रॅलीचे आयोजन. ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य खरोखर कौतुकास्पद –एसीपी घेटे
![]()


पोलीस वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे बंडपथक विद्यार्थी रॅलीचे आयोजन. ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे: एसीपी घेटे
ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी ) ६ जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता कल्याण शहर पोलीस वाहतूक विभाग व आर एस पी संघटन नागपूर,विभाग कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण (प)येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त,एसीपी घेटे साहेब,वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक गिरीश बने यांचा नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा अभियान जनजगृती मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक ते शिवाजी चौक या दरम्यान रॅली काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांबद्दल माहिती, घोषणा देण्यात आल्या.
.यावेळी प्रसंगी पोलीस सह. आयुक्त घिटे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग कल्याण गिरीश बने,
आर एस पी &सी डी संघटन नागपूर यांच्या मार्गदर्शनानुसार-
ठाणे ग्रामीण,पालघर जिल्हा,आणि नाशिक विभागिय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
कल्याण डोंबिवली शहरसमादेशक अनंत किनगे ,
आर एस पी अधिकारी बन्सीलाल महाजन, बापूराव आधारकर शाळेचे आर एस पी अधिकारी जितेंद्र सोनवणे, सिद्धार्थ माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कल्याण शहर वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक अजित कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य खरोखर स्तुत्य आहे,आमचे जीवन सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी कर्तव्य करीत आहेत अश्या शब्दात एसीपी घेटे साहेब यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसीपी कार्यालयातील पोलीस अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, वाहतूक वॉर्डन, यांनी विशेष परिश्रम घेतले.

