1 min read

आरोग्य वर्धीनी केंद्र अंतर्गत उप आरोग्य केंद्र-साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा चोपडा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी सह टिमची भेट

Loading

आज दि.०६/०१/२०२४ रोजी शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र अंतर्गत उप आरोग्य केंद्र-साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा चोपडा येथे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.जयंत मोरे, तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.विवेकानंद बिराजदार सोबतच, चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांनी भेट दिली.
भेटी प्रसंगी दवाखान्याची बाहेरील व आतील स्वच्छतेची पाहणी केली,
OPd च्या रुग्णांशी हितगुज साधुन रूग्णांना घराजवळ दवाखाना आल्यामुळे त्याचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा व आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले,
परिसर स्वच्छ,पिण्यास स्वच्छ व शुद्ध पाण्याचे व्यवस्थापन ठेवणे, औषधींचा साठा पुरेसा ठेवणे, मुदत बाह्य औषधी ठेवू नये आदी सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पाटील तथा डॉ.जैस्वाल यांच्यासह उपस्थीत सर्व कर्मचारी वर्गांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *